मराठी मंडळ कोरिया श्रीगणेशोत्सव-२०२२

September 9, 2022 - 12:00 am

सप्रेम नमस्कार,

मंडळी, श्रीगणेशोत्सवाचे औचित्य साधून मराठी मंडळ कोरिया खास आपणासाठी घेऊन येत आहे श्री-गणेशोत्सव -२०२२. तरी विघ्नेश्वर श्रीगणेशाचे शुभाशीर्वाद प्राप्त करून गणपती बाप्पास निरोप देण्यासाठी, आपल्या कार्यक्रमास सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून कार्यक्रमाची रंगत वाढवून बाप्पास निरोप द्यावयास आपण यावे व आम्हास उपकृत करावे हि साग्रह विनंती. या प्रित्यर्थ आपणा सर्वांसाठी मराठी मंडळ कोरियाने सालाबाद प्रमाणे आपल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी एका भव्य अश्या सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन केले आहे. तरी ज्यांना या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपली कला सादर करायची आहे त्यांनी संपर्क करावा.
संपर्क: कु. विजय दि. चव्हाण : ०१०-४६६५-२००२
मंडळी, या श्रीगणेशोत्सव सोहळ्यात सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या फॉर्म वर आपले नाव नोंदवावे ही नम्र विनंती.

 

 

येत्या 9/9/2022 तारखेला होणाऱ्या गणेशोत्सव सांस्कृतिक कार्यक्रमासाठी तुम्ही सर्वानी दिलेल्या उस्फूर्त प्रतिसादाबद्दल आणि सहकार्याबद्दल मराठी मंडळ कोरियामार्फत सर्वांचे हार्दिक आभार

इथून पुढील रेजिस्ट्रेशन थांबवले आहेत तरी याची सर्वांनी नोंद घ्यावी.


बुकिंग होऊ शकत नाही