
नमस्कार मंडळी !!
सालाबादप्रमाणे यंदाही मराठी मंडळ कोरिया, गणेश उत्सव साजरा करणार असून, खास आपल्या सर्वांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी आयोजित केली आहे. मंडळाच्या श्रींची प्रतिष्ठापना श्री. अमित भट यांचे सेऊल येथील घरी करण्यात येईल. सध्याचा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि नियम लक्षात घेता सर्व आरती आणि कार्यक्रम “ऑनलाइन – झूम अँप द्वारे करण्याचे ठरलेले आहे.
तरी, सर्वाना नम्र विनंती आहे कि खालील निमंत्रणपत्रिका पाहावी आणि सदर गणेशोत्सवाच्या दररोजच्या आरती आणि सांस्कृतिक तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभाग घ्यावा आणि उत्सवाची शोभा वाढवावी. धन्यवाद! गणपती बाप्पा मोरया !!!
श्री प्रतिष्ठापना दिन: भाद्रपद शु ।। चतुर्थी; शुक्रवार दिनांक १० सप्टेंबर २०२१
प्रतिष्ठापना, गणेश आरती वेळ: सकाळी ११:००
दररोजची गणेश आरती: सकाळी ९ वा. आणि रात्री ८.३०
मनोरंजनात्मक सादरीकरणाची वेळ: संध्याकाळच्या आरतीनंतर
सदरचा “ऑनलाइन गणेशोत्सव” हा १० सप्टेंबर ते १४ सप्टेंबर २०२१ असा पाच दिवस चालेल.
Zoom meeting ID: 818-598-6392 ; Pass-code: 771623