निवेदन – विषय : मराठी मंडळ कोरिया श्रीगणेशउत्सव २०२०

प्रिय म.म.को सभासद वर्ग ,

आपण सर्वांस कळवण्यात येते कि ह्या वर्षी कोरिया सहित सर्व जगात कोव्हीड ( covid ) महामारीची ( साथीची ) भीषण परिस्थिती उद्भवल्यामुळे आपला दरवर्षी होणारा श्रीगणेशउत्सवाचा समारंभ कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय म.म.को च्या सर्व नियंत्रकांच्या सल्लामसलतीने घेण्यात आला आहे . आपला ह्यावर्षीचा सामूहिक श्रीगणेशउत्सव समारंभ जरी रद्द करण्यात आला असला तरी , म.म.को तर्फे श्रीगणेश मूर्तीची स्थापना अमित भट ह्याच्या जोंगांक ( Jonggak , Seoul ) येथील घरी २२ ऑगस्ट २०२० ह्या दिवशी श्रीगणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर होणार आहे आणि २७ ऑगस्ट २०२० पर्यंत रोज पूजा , प्रसाद आणि दोन वेळची आरती त्यांच्या घरी परिपूर्ण केली जाईल. २७ ऑगस्ट २०२० ला संध्याकाळी गौरी विसर्जन मुहूर्तावर श्रीगणेश मूर्तीची उत्तरपूजा करून मूर्ती प्रतीकात्मक विसर्जित केली जाईल , म्हणजे हलवली जाईल .
ज्या सभासदांना श्रीगणेश मूर्तीचे live दर्शन घेण्याची अथवा live आरती बघायची इच्छा असल्यास त्यांनी अमित भट अथवा तनुजा भट वहिनी ह्यांच्याशी संपर्क साधावा हि विनंती .
अमित भट, भ्रमणध्वनी ०१०-५०६४-०९७७ / तनुजा भट , भ्रमणध्वनी ०१०-९२६५-०९७७
आपण अशी आशा करू हा येणारा श्रीगणेश उत्सव सर्व संकटे आणि हे साथीचे रोग दूर पळवून लावून त्याचा नाश करील आणि आपल्या सर्वांच्या आयुष्यातील घडी पूर्वपदावर येईल . शेवटी आपण असे म्हणू कि ” गणपती बाप्पा मोरया … पुढल्या वर्षी लवकर या ” . आणि खरोखरच पुढच्या वर्षी आपला हा म.म.को चा श्रीगणेशउत्सव सामूहिक समारंभ कार्यक्रम आपण मोठ्या थाटात साजरा करूयात हीच इच्छा बाळगु .

आपले कृपाभिलाषी
म.म.को नियंत्रक मंडळ , मराठी मंडळ कोरिया
३१ जुलै २०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *