मराठी मंडळ कोरिया आभार पत्र

मंडळी नमस्कार,
मराठी मंडळ कोरियाच्या गणेशोत्सव समारंभास आपण जो भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मराठी मंडळ कोरियाच्यावतीने मनःपूर्वक आभार. ‘विधिवत गणेश-पूजा’, ‘ अतिथी स्वागत’, ‘शास्त्रशुध नृत्याविष्कार’, ‘बालकलाकारांची निरागसता’, ‘अवखळ, निर्मळ आणि गंभीर कविमन’, ‘बेधुंद करून टाकणाऱ्या सांस्कृतिक नृत्यकला’ आणि ‘स्वादिष्ट भोजन’ हे सर्व कालच्या कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये. ह्या सर्व कार्यक्रमास सर्वतोपरी मदत करून सर्वोच्च शिखरावर न्हेऊन ठेवणाऱ्या मराठी मंडळ कोरियाच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करावे तेव्हडे थोडे आहे. त्याचबरोबर बाप्पाची व त्याच्या दर्शनास येणाऱ्या प्रत्येकाची मनोभावे सेवा करणाऱ्या अमित दादा व तनुजा वाहिनी भट यांच्या ऋणात आम्ही राहू इच्छितो. कार्यक्रमास यथार्थ मदत करणाऱ्या कोरिया इंडिया असोसिएशन (KOINA) चे व इंडियन्स इन कोरिया (IIK) चे मंडळ ऋणी आहे. सदर कार्यक्रमास आर्थिक मदत आणि स्पर्धाकांना भेट वस्तू दिल्याबद्दल सेंटबी (Sentbe) कंपनीचे आणि सर्व देणगीदारांचे आभार. कार्यक्रमात भाग घेऊन उत्सवास रंगात आणत कार्यक्रम यशस्वी करणाऱ्या प्रत्येक कलोपासकाचे अभिनंदन व आभार, बालकलाकारांचे कौतुक व त्यांस खूप खूप शुभाशीर्वाद. कार्यक्रमास उपस्थित वयाने, मानाने, ज्ञानाने व अनुभवाने मोठ्या असलेल्या सर्वांना सप्रेम नमस्कार करून कार्यक्रमाविषयी आपले मत जाणून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत हे जाणवू इच्छितो. कार्यक्रमास भरगोस प्रोत्साहन देणाऱ्या श्रोते वर्गाचे सुद्धा आभार, आपल्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेने कार्यक्रमाची रंगात आणखीनच वाढविली ह्यात दुमत नाही. कार्यक्रमावेळी जाणते-अजाणतेपणाने काहीही चूक किंवा काही राहून गेल्यास आपण मोठ्या मनाने आम्हास क्षमा कराल अशी अपेक्षा न्हवे विश्वास बाळगून आम्ही बाप्पा चरणी आपल्या सफल व दीर्घायुष्याची मागणी करून इथेच थांबतो. इति लेखन सीमा. म. म. को. बद्दल लोभ आहेच तो वृद्दिंगत व्हावा हीच इच्छा.

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या!!!!!

धन्यवाद

मराठी मंडळ कोरिया.

Special Thanks to Namaste Korea for participating our event. Please do watch this beautiful video.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *