महाराष्ट्र पूरग्रस्त मदतनिधी उपक्रम (ऑगस्ट २०१९)

आपल्या सर्वांना माहिती असेलच कि सध्या संपूर्ण महाराष्ट्राला प्रचंड पावसाच्या तडाख्याने गंभीर पूरग्रस्त परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे . कोल्हापूर, सांगली , सातारा, ठाणे , नाशिक , पालघर, रत्नागिरी, रायगड , सिंधुदुर्ग सहित इतर अनेक जिल्हे आणि गावे ह्या महापुराच्या विळख्यात सापडली आहेत . अनेक नागरिक स्थलांतरित झाले आहेत . ह्या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी NDRF आणि सरकारी यंत्रणेसहित अनेक समाजसेवी संस्था मदतकार्य करण्यात व्यग्र आहेत.

आपल्या मराठी मंडळ कोरियाच्या ( म.म.को ) ब्रिदवाक्या प्रमाणे “एका मेका सहाय्य करू , अवघे धरू सुपंथ” आपली सामाजिक बांधिलकी आहे कि आपला देखील ह्या मदत कार्यात सहभाग असावा . पूरग्रस्त भागात आपण जरी प्रत्यक्ष जाऊन मदत करू शकत नसलो तरीही म.म.को तर्फे मदतनिधी जमवून आपण तो महाराष्ट्र सरकारच्या पूरग्रस्त सहाय्यता निधी मध्ये जमा करून आपला अप्रत्यक्ष सहभाग देऊ शकतो.

मराठी मंडळ कोरिया तर्फे आपण सर्वांस विनंती आहे कि आपापल्या इच्छेनुसार खाली दिलेल्या बँक खात्यात देणगी रक्कम जमा करून म.म.को च्या ह्या उपक्रमात आपला अमूल्य सहभाग द्यावा . देणगी रक्कम आज पासून जमा करण्यास हरकत नाही . देणगी रक्कम भरण्याची अंतिम तारीख २० ऑगस्ट २०१९.

मदतनिधी येथे जमा करणे :
बँक खाते क्रमांक : ११०-४१४-८८७-१८१
शिनहान बँक
खातेधाराचे नाव : डॉ . अविनाश अशोक कदम
इमेल : avikadam2010@gmail.com

बँक खाते क्रमांक :१००२-०५९-०७४०३८
उरी बँक
खातेधाराचे नाव : दिलीप विठ्ठल पाटील
इमेल : dilipraje.patil@gmail.com

१. कृपया बँक मधून निधी पाठवताना MMK-Flood हे शीर्षक वापरावे जेणेकरून निधी साठीची रक्कम ओळखण्यास उपयुक्तता होईल.
२. निधी पाठवल्यानंतर ‘ avikadam2010@gmail.com ‘ वर एक इ-मेल करावा ज्यामध्ये देणगीदाराचे नाव आणि रक्कम असेल.

वरील खात्यात २० ऑगस्ट २०१९ पर्यंत जमा झालेला सर्व मदतनिधी “मुख्यमंत्री सहाय्यता निधी”, महाराष्ट्र राज्य ह्यांच्या खात्यात म.म.को तर्फे जमा करण्यात येईल आणि त्याची पोचपावती तसेच देणगीदारांची सूची म.म.को फेसबुक पेज तसेच म.म.को च्या महाजालावर ( website ) जाहीर केली जाईल.
आपले सदैव कृपाभिलाषी आणि आपलेच
मराठी मंडळ कोरिया

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *