दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत २०१५

महाराष्ट्र दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत उपक्रम
प्रिय, बंधू आणि भगिनींनो !
आपल्या मराठी मंडळ कोरियाचे ब्रीदवाक्य आहे, एका मेका सहाय्य करू , अवघे धरू सुपंथ. हे ब्रीदवाक्य फक्त कोरियापुरते मर्यादित नसून याचा अवाका संपूर्ण महाराष्ट्र देखील व्यापून आहे. ह्या अंतर्गत मराठी मंडळ कोरिया ने सामाजिक उपक्रम राबविण्याचे कार्य, वर्ष २०१४ पासून चालू केले आहे. मागच्या वर्षी आपण माळीन गावाच्या पुनर्वसनासाठी निधी जमा करून तो वनवासी कल्याण आश्रम, पुणे ह्या संस्थेस सुपूर्द करण्यात आला. सामाजिक बांधिलकीची जाण ठेऊन, ह्या वर्षी देखील आपण एक असाच उपक्रम हाती घेत आहोत. आपल्याला माहित आहे कि गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात शेतकरी बांधवाना अनेक संकटाना सामोरे जावे लागले आहे व त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे व हे आत्महत्या सत्र अजून असेच चालू आहे. त्यात भर म्हणून कि काय, नुकतेच, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील अंदाजे १४,७०८ गावे दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केली आहेत. शेतकऱ्यांसाठी सर्व स्तरातून मदतीचा ओघ आपापल्यापरीने चालू आहे. तरीही एक भारतीय आणि महाराष्ट्रीय म्हणून, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आपल्या परीने मदत करणे हि आपली नैतिक व सामाजिक जबाबदारी आहे असे मराठी मंडळ कोरिया मानते. हाच हेतू मनात बाळगुन मराठी मंडळ कोरिया आपल्या सर्व सभासदांना आणि मित्रांना आवाहन आणि विनंती करते कि, प्रत्येकाने आपल्या इच्छे नुसार आर्थिक मदत करून आमच्या ह्या सामाजिक उपक्रमात आपला सहभाग द्यावा. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे पुढे सरसावलेत. ह्यासाठी त्यांनी काही स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन नाम फाऊंडेशन नावाची बिनसरकारी संस्था स्थापन केली आहे. संस्थेच्या विश्वस्त मंडळात श्री. नाना पाटेकर, श्री. मकरंद अनासपुरे, ॲङवोकेट श्री. उज्वल निकम, डॉ. अविनाश पोळ आणी अशीच आपापल्या क्षेत्रात नावाजलेली व्यक्तिमत्व आहेत. आपल्या ह्या उपक्रमाद्वारे जमा होणारी मदतीची रक्कम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण ह्याच संस्थेला सुपूर्द करणार आहोत. आपली मदत कोरियन वोनच्या रुपात आपण खाली दिलेल्या बँक खात्यात जमा करावी. जमा झालेली सर्व रक्कम भारतीय रुपयांमध्ये धनादेश स्वरुपात (चेक) नाम फाऊंडेशन च्या श्री. नाना पाटेकर यांच्या कडे प्रत्यक्षरित्या सुपूर्द करण्यात येईल (तशी तयारी नानांनी देखील दर्शवलेली आहे). देणगी २४ नोव्हेंबर २०१५ पर्यंत जमा करावी. देणगीदारांची नावे व देणगीची एकूण रक्कम (वैयक्तिक देणगी रक्कम विरहित) मराठी मंडळ कोरिया च्या दिवाळी अंक, फेसबुक तसेच वेबसाईट वर जाहीर केली जाईल. नाम फाऊंडेशन तर्फे मराठी मंडळ कोरिया च्या नावे लिखित पोचपावती मिळणार आहे. चला तर मग आपल्या मातृभूमी पासून लांब राहून प्रत्यक्षात नाही तर अप्रत्यक्ष रीतीने मदत करून आपापला खारीचा वाटा उचलूयात.

मराठी मंडळ कोरिया तर्फे सर्व देणगीदारांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.
दि. २८-११-२०१५ पर्यंत देणगीदरांची नावे खालीलप्रमाणे आहेत;
1. Mr. Sachin Chavan – 100,000/- KRW
2. Mr. Amit Bhat – 50,000/- KRW
3. Mr. Mandar Paradkar – 50,000/- KRW
4. Mr. Gajanan Ghodke – 51,000/- KRW
5. Mr. Pranveer Singh Rathore – 100,000/- KRW
6. Mr. Kiran Chaudhari – 21,000/- KRW
7. Mr. Atul Kulkarni – 10,000/- KRW
8. Mr. Vikram Sawant – 20,000/- KRW
9. Mr. Sudarshan Kumar – 5,000/- KRW
10. Mr. Chinmaya Joshi – 100,000/- KRW
11. Mr. Ganesh Sabale – 20,000/- KRW
12. Mr. Ramchandra Pode -50,000/-KRW
13. Mr. Nitin Raut – 50,000/-KRW
14. Mr. Ajay Bagul – 50,000/-KRW
15. Mr. Dhiraj Murale – 30,000/-KRW
16. Mr. Allakh Kulkarni – 50,000/-KRW
17. Mr. Sharad Patil – 20,000/-KRW
18. Mr. Namdeo Gaikwad – 50,000/- KRW
19. Mr. Bhagwan Batule – 21000/- KRW
20. Mr. Ganesh Agawane- 20,000/- KRW
21. Mr. Satish Nimse – 20,000/-KRW
22. Mr. Aniket Deshmukh – 40,000/- KRW
23. Mr. Amol Pawar – 40,000/- KRW
24. Mr. Dinesh Amalnerkar – 50,000/- KRW
25. Mr. Anil Valekar – 100,000/- KRW
26. Mrs. Anjali Deshmukh – 150,000/- KRW
27. Mr. Praksh Alagi – 10,000/- KRW
28. Mr. Santosh Sacket – 20,000/- KRW
29. Ms. Prisha Chaudhari – 21,000/- KRW
30. Mrs. Supriya Patil – 10,000/- KRW
31. Mr. Eshan Amalnerkar – 15,000/- KRW
32. Anonymous – 50,000/- KRW
33. Mr. Erfan Rather – 20,000/- KRW
34. Mrs. Dipali Upare – 25,000/- KRW
35. Mr. Nanasaheb Shinde – 25,000/- KRW
36. Mr. Prakash Sultane – 20,000/- KRW
37. Mrs. Shruti Shukla – 50,000/- KRW
38. Mr. Umakant Patil – 21,000/- KRW
39. Mr. Sachin Chitale – 20,000/- KRW
40. Mr. Abhijeet Borgule – 20,000/- KRW
41. Mr. Mane – 21,000/- KRW
42. Mr. Arvind Jadhav – 20,000/- KRW
43. Mr. Harsharaj Jadhav 20,000/- KRW
44. Mr. Avinash Choughule – 20,000/- KRW
45. Mr. Gaurav Thorat – 20,000/- KRW
46. Mr. Asif Tamboli – 20,000/- KRW
47. Mr. Harshad Bandal – 20,000/- KRW
48. Mr. Amol Jadhav – 20,000/- KRW
49. Mr. Vishal Mayani – 25,000/- KRW
चला तर मंडळी आपल्या मातृभूमी पासून लांब राहून प्रत्यक्षात नाही तर अप्रत्यक्ष रीतीने मदत करून आपापला खारीचा वाटा उचलूयात.
।। जय महाराष्ट्र ।।
धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *